Thursday 7 October 2010

एक प्रवास

एक प्रवास
अनादिपासून अनन्तापर्यन्त्चा
एकच
कारण सध्यातरी तोच माहीत आहे!
पण हां प्रवास केंव्हा -कुठे सुरु झाला?
आणी का?
अन्तराळात विहरणारा आत्मा
प्रुथ्वीवर का अवतरला? त्यालाच यायचे होते,
कि राहिले होते काही देणे द्यायचे?

आला आणी ---
बाकीचे सगळे विसरला।
ईथल्या भवनाट्यात, नात्या-गोत्यात
गुन्तत गेला।
आई-वडिल, भाऊ-बहिणी.....
असन्ख्य नाती आणी अस्न्ख्ह्य गुन्ते!
क्श्णोक्श्णी अनुभवले भावनान्चे तरन्ग
जीवनात ऊचम्बळणारे ्सुख-दुःखान्चे रन्ग।

हा माझा, ही माझी, हे माझे, ते माझे----
किती तो हव्यास
कर्त्रुत्वाचा, विजयाचा आणी सुखाचा
अविरत ध्यास।

आटापीटा,धड्पड सगळीकडे पुरे पडण्याची
प्रत्येकाची ईच्छा ,जरूरत पूर्ण करण्य़ाची।
आणी समाधान ही!

करता करता करता
दिवस गेले, महिने गेले---
कितीक वर्ष ही सरली।
सगळ्याना सगळे भरुन पावले
ज्यान्ना जे पाहिजे ते दिले।

सगळे आपल्या जगात रमले.
कॄतार्थ मी, धन्य मी
याच ठिकाणी, याच वेळी-
जन्म घेतल्याचे सार्थक झाले।

मागे वळून पाहताना
आठव्तात काही क्श्ण।
सुखाचे,दुःखाचे--
आणी हुरहुरीचे सुद्धा।

हेच सन्चित माझे
घेऊन करायचा पुढचा प्रवास
पुन्हा एकदा अन्तराळात जाईपर्यन्त
हेच गाठोडे येईल कामी कदचित
पुन्हा एका नव्या सुरुवातीला---

पण प्रार्थना देवा ऐका माझी लीन
होऊदे माझा आत्मा तुझ्यातच विलीन

3 comments:

  1. omg.. how beautiful! how true! no words to describe.. pan ek sangu ka? ashya poems vachlya ki bhiti vatte.. mahit nahi kasli.. pan thodi bhiti vatte.. beautiful poem

    ReplyDelete
  2. अरुणाताई आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद. आपण आपल्या मित्रांना हे पोस्ट पाठवू शकता . पण माझे लिखाण अतिरेकी असते पण सध्याची परीस्थिती पाहून मनातला उद्रेक बाहेर पडतो त्याला माझा नाईलाज आहे. हे आपण जाणून विचार करून पाठवा. माझी पूर्ण परवानगी आहे. कांही सूचना असतील तर कळवा.

    ReplyDelete
  3. .छानच झाली आहे कविता.

    ReplyDelete