वाचनाचा केरवा
आयडियल
सोसायटीच्या ग्राऊंडवर श्री. संजय भास्कर जोशी यांचे ‘वाचू आनंदे’ या विषयावर भाषण
झाले. त्यांनी सांगितले की प्रत्येक प्रकारच्या वाचनाचा एक ताल असतो. केरवा
तालाप्रमाणे वाचनाचेही आठ मात्रा – टप्पे असतात.
पहिला टप्पा असतो—स्वानंदाचा.
वाचनाने आपल्या मनाला आनंद होतो. पुस्तकाच्या दोन कव्हर्स्मध्ये अवघ्या जगातील
सुखदुःखे आपल्या ओंजळीत घालायची शक्ती आहे. त्यामुळे आपले अनुभव विश्व विस्तारते, समृद्ध
होते. मनाला आनंद मिळतो.
दुसरा टप्पा असतो—भाषेचा,
मातृभाषेचा. आपली मातृभाषा समृद्ध करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. आपण तिचा आदर
केला पाहिजे. तिचा प्रसार जास्तित्जास्त क्सा होईल हे कृतीने दाखवून दिले पाहिजे.
पुस्तके वाचून, त्यांच्याबद्दल चर्चा करून, आणि स्वतः लिहून भाषावर्धनाचे काम
करावे.
तिसरा टप्पा-–पूर्णानंद.
पुस्तक वाचनाचा संपूर्ण आनंद कसा मिळवावा? पुस्तक संपूर्ण वाचावे, म्हण्जे आधी
पुस्तकाचे कव्हर नीट बघावे. कलाकाराने
त्या चित्रात कादंबरीचा आत्मा चितारलेला असतो. त्याचे कष्ट, विचार आणि कला त्यात
ओतलेली असते. त्याचा आस्वाद घ्यावा. तसेच पुस्तकाची अर्पणपत्रिका पण वाचावी समजून
घ्यावी. त्यामागचा विचार समजून घ्यावा. मग पुस्तक वाचावे. कथा किंवा कादंबरी असेल तर आधी प्रस्तावना वाचू
नये कारण त्यामुळे आपली मत आधीच बनले तर गोष्टीचा आस्वाद नीट घेता येत नाही.
चौथा टप्पा—दाद द्यावी.
आपण वाचलेले पुस्तक किंवा कथा आपल्याला आवडली तर त्या लेखकाला तसे आवर्जून कळवावे.
त्यामुळे लेखकाला आनंद वाटतो आणि त्यांचा उत्साह दुणावतो. लेखकाशी संपर्क झाल्यास
आपलेही विचारविश्व विस्तारते.
पाचवा टप्पा—प्रसार
करा. आपण जर काही चांगले वाचले तर ते आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर, प्रियजनांबरोबर
शेयर करा. त्यांनाही आनंद मिळू द्या. त्यामुळे तुमचाही आनंद दुणावतो. भेट्वस्तू
देतांना पुस्तके द्या.
सहावा टप्पा—लिहून
ठेवा. जे पुस्तक चांगले वाटेल त्याबद्दल लिहून ठेवा. ते आपल्याला का आवडले,
त्यातून आपल्याला काय उमजले त्याची नोंद करावी. कालांतराने आपलाच वाचक कसा घडत
गेला पाहणे रंजक ठरेल.
सातवा टप्पा—वाचता
वाचता आपल्यापुरते उत्तम साहित्याचे निकष बनवावे. पुस्तकांचे मूल्यमापन करावे. आपण
स्वतःच साहित्यातील मोती वेचणारा राजहंस बनावे.
आठवा टप्पा—स्वतः
लिहावे. वाचता वाचता आपणही लिहायची सवय लावून घ्यावी. आपले लेखन दुसर्यांना
वाचण्यासाठी, त्यांच्या अभिप्रायासाठी, किंवा छापण्यासाठी नसून स्वानंदासाठी आहे
हे लक्षात ठेवावे.
No comments:
Post a Comment