Wednesday, 12 May 2010

रुद्र--लेकाख विलास सारन्ग.

पुराणकाळातील किम्बहुना त्याही पूर्वीच्या वेदकाळातील घटनान्चा आजच्या मानसिकतेने विचार करून त्याचे स्पष्टीकरण करायचा प्रयत्न लेखकाने केला आहे।
मूळ गृहीतक आहे माणसाचे आदिम पाप---
सारन्गान्च्या म्हणण्याप्रमाणे ब्रह्मदेवाने प्रथम पुरुष निर्माण केला व नन्तर स्त्री। म्हणजे एक प्रकारे ते दोघे एकमेकान्चे भाउ-बहीण झाले।मग मानव जात वाढवण्यासाठी त्यान्चा सन्ग म्हणजेच पहिले आणी आदिम पाप।आणी सर्व मानव जात ही या पापाची परिणती आहे।मग सगळे जगच पापी। अशा प्रकारचे द्दखले सगल्या धर्माच्या मूळ ग्रन्थामधे मिळतात।। सारन्ग म्हणतात कि देव हे मानवान्हून वेगळे आहेत।्त्याना कसलेच बन्धन नाही।ते फ़क्त आनन्द उपभोगतात!
प्रुथ्वीच्या सुरुवातीच्या कल्लोळातून --आग, तप्त लावा आणी धूर--जन्माला आला काळा कभिन्न असा रुद्र। देवान्चे अबोध मन।(सारन्ग या निश्कर्शा पर्यन्त कसे पोचले ते माहीत नाही)पण म्हणजे गोरे पान, देखणे देवही आतून काळेच आहेत।
रुद्र हा आदी शूद्र पण आहे।(ही सगळी पुस्तकात माडलेली मते आहेत।)देव आपली सगळी क्रुष्णक्रुत्ये त्याच्याकडून करून घेतात।खरे तर तो पशुपति आहे। गाई बैल राखणारा।आणि देवान्न यद्न्यासाठी पुरवणारा, यद्न्यात पशुबळीन्ची हत्या करणार म्हणून तो शूद्र।------
पुस्तकात याच गोषती सान्गणार्या कथा वेगवेगळ्या रीतीने व कालसन्दर्भात लिहिलेल्या आहेत। लेखक पुन्हा पुन्हा पाप सन्कल्पनेवर ही येतो। काही प्राचीन्तर काही अर्वाचीन दखले ही देतो।उद। जन्मजात विक्रुती ह्या बहाउ-बहीण, पिता-पुत्री याच्या समागमामुळे, रक्त शुद्द्ध ठेवत्याच्या अट्टाहासामुळे वाढीला लागल्या। मिश्र समागमामुळे होणारी सन्तती श्रेष्ठ असते।
एकुणच लेखकाला निश्चित पणे काय सान्गायचे आहे याचा बोध होत नाही।अनेक प्रश्नाचे उत्तरेही मिळत नाहीत। उद। ब्रम्हदेवाने एकच स्त्री आणी एकच पुरुष का निर्माण केला?जास्त का नाही? आणी जर ते कोणाच्या उदरातून जन्माला आले नसतील तर ते भाउ बहीण कसे? त्यान्चे ब्लड ग्रूप पण एक नसतील। पशुपति आधी काळा होता मग तो गोरा कसा झाला?
पुस्तकात काहीतरी वेगळे, सन्सनाटी, धक्कदायक लिहायचे एव्हढाच उद्देश दिसतो.

No comments:

Post a Comment