Monday, 26 September 2016

सुख म्हणजे नक्की काय असत?

      सुख म्हणजे नक्की काय असते? कोणास माहीत! कोणी पाहिलय? प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा, अनुभूती वेगवेगळी! पण सगळे सुखाच्या मागे धावत असतात.  पकडून ठेवायचा प्रयत्न करत असतात. आणि ते मात्र मृगजळाप्रमाणे, समोर दिसते, पण पकडायला गेले तर ते तिथे नसतेच! मग ते असते कुठे? आपल्या मनामध्ये? कल्पनेत? की तो एक फक्त आभास असतो? सुख ही एक आपल्या भावनिक अनुभवाची कल्पना आहे. हा अनुभव प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. त्याच्या कडे बघण्याचा दृष्टिकोन, त्याच्या अनुभूतीची तीव्रता, जाणीवेची तीव्रता, हे सर्व व्यक्तिसापेक्ष आहे. जेव्हढी तीव्रता जास्त, तेव्हढी त्या सुखाची अनुभूती जास्त.आणि हो, या अनुभूतीचीही प्रत्येकाची कल्पना वेगळी वेगळीच!ज्या गोष्टीमुळे एकाला स्वर्गसुखाचा अनुभव येतो, त्याच गोष्टीबद्दल दुसर्‍याला घृणा पण असू शकते.

मग सुख म्हणजे काय? ज्याप्रमाणे अंधाराचा अभाव, म्हणजे प्रकाश असे म्हणतो, त्याच प्रमाणे दुःखाचा अभाव म्हणजे सुख असते का? माहीत नाही, पण सुखाबद्दल एव्हढा सगळा विचार करण्याऐवजी आपण आपल्या सुखाचे क्षण मोजावेत.
 कोणत्याही स्त्रीला विचारा, असह्य प्रसूतीवेदना सहन करून श्रांत-क्लांत झाल्यावरही तिच्या बाळाचे पहिले ’ट्याहा’ तिला स्वर्गसुख देऊन जाते. तो बाळाचा पहिला स्पर्श म्हणजे स्वर्ग सुख नाही तर आणखी काय? पण कितीतरी छोट्या छोट्या गोष्टींमध्येही सुख असते-------
             सुख असते--     वार्‍य़ाच्या मंद झुळकेत,
                                     पावसाच्या पहिल्या शिडकाव्यात,
                                     तापलेल्या धरतीवर पाऊस पडल्यावर दरवळणार्‍या सुगंधात
                                     खिडकीतील मोगर्‍याच्या  सुवासात.
           सुख असते          आपल्या लहानग्यांनी मारलेल्या मिठीत
                                     नवर्‍याच्या कौतुकाच्या नजरेत
                                     मैत्रिणीच्या गुजगोष्टींमध्ये
                                     सर्व आठवणींमधे हरवून जाण्यात!
          सुख असते---       कोणासाठीतरी काहीतरी करण्यात,
                                     सर्वांना पोटभर खाऊ घालण्यात,
                                     'You are the Best!' हे ऐकण्यात,
                                      कोणासाठीतरी स्वतःला हरवून जाण्यात!
          सुख द्यावे --सुख घ्यावे, सर्वांनी सुखी असावे.

Wednesday, 1 July 2015

memories

माझा अविस्मरणीय अनुभव
खरे तर आपल्या जीवनात जे काही बरे वाईट घडते, ते आपण कधीच विसरू शकत नाही. अगदी ठरवून सुद्धा! म्हणजे मग सगळेच अविस्मरणीय, नाही का? पण लोकशाहीत जसे सगळे लोक समान असतात, पण काही काही लोक जरा जास्त समान असतात, तसेच कही काही अनुभव पण जरा जास्त अविस्मरणीय असतात. आता त्यातून एक निवडायचा तर कठीण. पण सध्या एकच पुरे.
      त्यावेळी आम्ही काश्मिरमध्ये रहात होतो. म्हणजे माझे पती त्यांच्या कामाच्या जागी, व्हेरिनाग येथे. अतिशय नयनरम्य ठिकाण आहे. या ठिकाणी झेलम नदीचा उगम आहे. उगमाच्या ठिकणीच नदीचा स्रोत इतका मोठा आहे की त्यावर जवळ जवळ ५० फ़ूट व्यासाचे  २२० फ़ूट खोलीचे अष्टकोनी कुंड बाधलेले आहे. बाजूनी दगडी कमानी आहेत. त्यात सोनेरी आणि रुपेरी रंगांचे दीड, दोन फ़ूट लांबीचे ट्राउट मासे पोहत असतात. अर्थातच तिथे मासे पकडायला बंदी आहे. १० फ़ूट रुंदीचा झेलमचा निर्झर समोर खळखळा वहात असतो. त्याच्या दुतर्फा विविध फुलांनी आणि हिरवळीने सजलेली प्रचंड मोठी बाग आहे. पूर्वी बर्‍याच सिनेमांचे शूटिंग इथे व्हायचे. असे म्हणतात की ही बाग पहिले बांधली आणि मग याच्या धर्तीवर श्रीनगरच्या शालिमार आणि निशात बागा तयार केल्या!
      शेजारी असलेल्या छोट्या टेकडीवर आमचे छोटेखानी बंगले होते. ज्यावेळी सन्‍ १९५८ मध्ये जर्मन लोक जवाहर टनेल बनवत होते त्यावेळी त्यांनी त्यांच्या राहण्यासाठी हे बंगले बांधले होते. आता ते बॉर्डर रोड्सच्या ताब्यात होते. त्यांची आखणी पण सुंदर होती. आमच्या स्वतःच्या फुलबागा होत्या. आणि घराच्या मागच्या बाजूला भाजी, शेती इत्यादी. पाहिजे ते लावा.  आम्ही तिथे ७-८च फ़ॅमिलीज होतो.  अगदी चुरशीने विविध फुलांची आणि भाज्यांची लागवण करायचो. अर्थातच, आमच्या प्रत्येकाच्या दिमतीला एक स्वतंत्र माळी होता. रोज सकाळी नवरे लोक ब्रेकफ़ास्ट करून ऑफ़िसला गेले की मग बाहेर पडायचे. माळ्याबरोबर बागेत फेर-फटका. कुठे काय लावायचे, काय खत आणायचे वगैरे वगैरे. म्हण्जे तो अनुभवी असल्यामुळे तो सांगायचा आणि आपण मान डोलवायची. सकाळी त्या सुंदर फुलांचे दर्शन मन प्रसन्न करायचे. मग परसदारी, मुलीच्या समवेत जायचे. ताजी कोवळी गाजरे, लाल मुळे उपटून खायला मजा यायची. घरात सफर्चंद, पेअर, प्लम्स इ.ची पण झाडे होती. मुली झाडांवर चढून फळे तोडून खायच्या. एकूणच अतिशय सुखाचा आणि मजेचा काळ होता. माझेही वय लहान होते. मी फक्त जगातील सौंदर्यच पाहिले होते. खर्‍या जगातील गतिविधींची अजून ओळख व्हायची होती. मी प्रत्येक छोट्या गोष्टीतून आनंद घेण्यात मशगुल होते. खरे तर माझी मोठी मुलगी तेव्हा ७ वर्षांची होती शाळेत घालायला हवे होते. पण मी घरीच तिचा अभ्यास घेत होत. पुढच्या वर्षी एकदम तिसरीत घालण्यासाठी. त्यासाठी मला मुलींना घेऊन श्रीनगरला रहावे लागणार होते. तोपर्यंत आम्ही आयुष्याचा आनंद उपभोगत होतो.
दिवस तसा साधाच होता. आधी सांगितल्याप्रमाणे, सकाळी ब्रेकफ़ास्ट, बागेत फेरफटका, मग अंघोळी आणि कपडे धुणे! हो तिथे कपडे धुवायला कोणी मिळत नाही. आणि मग बाहेर पडायचे. रो कोणातरी एकीच्या घरी जमायचे. सगळ्यांच्या हातात लोकर आणि सुया. थंडीच खू ना तिकडे. थंडीच्या रोज दिवसात ३-४ स्वेटर्स लागायचेच. त्यामुळे कितीही स्वेटर विणले तरी कमीच! रोज नवीन नवीन स्नॅक्स. मजा. १२.३० ल घरी कारण नवरे लोक १ वाजता घरी यायचे. आता जेवण कोण करत होते, हा प्रश्न पडला असेल ना? आमच्या प्रत्येकाच्या घरी एक कुक होता.ते त्याचे किचन होते. आम्हाला तिथे त्याच्या परवानगीनेच प्रवेश! तर १ वाजता जेवण आणि मग वामकुक्षी. ४ वाजता काहीतरी गेमस्‍. बहुतेक बॅड्मिंट्न. किंवा मग मेस मध्ये पत्ते कुटायला. १ पैसा पॉईंट रमी. क्वचित ब्रिज. ६.३०- ७ पर्यंत घरी पार्टी नसेल तर रात्री जेवण आणि झोप.
सुंदर जीवन क्रम होता. पण प्रत्येक गोष्टीला अंत असतोच. माझे हे सुंदर जीवन पण श्रीनगरला  गेल्यावर थांबले असे नाही तर कमी झाले. मुलींच्या शाळा सुरू झाल्या. बाकी सकाळचा दिनक्रम बाग सोडली तर तसाच राहिला. दुपारी मुली घरी आल्यावर त्यांचे खाणे-पिणे, अभ्यास इ.मध्ये वेळ जाऊ लागला. आणि त्यामध्ये मी रमले. तिथे असतांना तर खूपच असे अनुभव आले, जे अविस्मरणीय आहे. ते पुन्हा केव्हातरी.

                          

Thursday, 7 October 2010

एक प्रवास

एक प्रवास
अनादिपासून अनन्तापर्यन्त्चा
एकच
कारण सध्यातरी तोच माहीत आहे!
पण हां प्रवास केंव्हा -कुठे सुरु झाला?
आणी का?
अन्तराळात विहरणारा आत्मा
प्रुथ्वीवर का अवतरला? त्यालाच यायचे होते,
कि राहिले होते काही देणे द्यायचे?

आला आणी ---
बाकीचे सगळे विसरला।
ईथल्या भवनाट्यात, नात्या-गोत्यात
गुन्तत गेला।
आई-वडिल, भाऊ-बहिणी.....
असन्ख्य नाती आणी अस्न्ख्ह्य गुन्ते!
क्श्णोक्श्णी अनुभवले भावनान्चे तरन्ग
जीवनात ऊचम्बळणारे ्सुख-दुःखान्चे रन्ग।

हा माझा, ही माझी, हे माझे, ते माझे----
किती तो हव्यास
कर्त्रुत्वाचा, विजयाचा आणी सुखाचा
अविरत ध्यास।

आटापीटा,धड्पड सगळीकडे पुरे पडण्याची
प्रत्येकाची ईच्छा ,जरूरत पूर्ण करण्य़ाची।
आणी समाधान ही!

करता करता करता
दिवस गेले, महिने गेले---
कितीक वर्ष ही सरली।
सगळ्याना सगळे भरुन पावले
ज्यान्ना जे पाहिजे ते दिले।

सगळे आपल्या जगात रमले.
कॄतार्थ मी, धन्य मी
याच ठिकाणी, याच वेळी-
जन्म घेतल्याचे सार्थक झाले।

मागे वळून पाहताना
आठव्तात काही क्श्ण।
सुखाचे,दुःखाचे--
आणी हुरहुरीचे सुद्धा।

हेच सन्चित माझे
घेऊन करायचा पुढचा प्रवास
पुन्हा एकदा अन्तराळात जाईपर्यन्त
हेच गाठोडे येईल कामी कदचित
पुन्हा एका नव्या सुरुवातीला---

पण प्रार्थना देवा ऐका माझी लीन
होऊदे माझा आत्मा तुझ्यातच विलीन

Sunday, 25 July 2010

असेच काहितरी , सहज सुचले म्हणून !!: पाऊस

असेच काहितरी , सहज सुचले म्हणून !!: पाऊस

पाऊस

नभ उतरु आले ,
जग झिम्माड झाल

खरच आहे, सगळ जगच बदलून जात पाऊस पडायला लागला की. त्याच्या तर्हा तरि किती! झिम झिम अन्गावर तुषार पाडून रोमान्चित करणारा पाऊस, जरा जोराने पडणारा ,हुरहुर लावणारा पाऊस, कोसळणार्या जलधारानी प्रियाची आठवण जागव्णारा पाऊस, आणी प्रिय जवळच असेल तर प्रेमाने चिम्ब करणारा पाऊस! विजेच्या कडकडात कोसळ्णारा, थरार आणणारा पाउस!
पाऊसच पाऊस!
पाऊस आवडत नाही, असे ही महाभाग आहेत. त्याना गालिब सारखे म्हणावेसे वाटते कि ’हाय कम्बख्त! अरे दुर्दैवी माणसा, जरा पावसात भिजून बघ, काय स्वर्गीय आनन्द मिळतो!’
आणी बाहेर पाऊस ,घरात गरम गरम भजी आणी मस्त कोफ़ी या सारखा आनन्द आहे का?

यापेक्शा जास्त मजा फ़क्त आपण घरात आणी बाहेर मस्त बर्फ़ पडत असेल तरच.खिडकीत बसून, हातात वाफ़ाळलेला चहा/कोफ़ी चा कप घेऊन पडणारे बर्फ़ पाहाणे हा अवर्णनीय आनन्द आहे.

Wednesday, 7 July 2010

एक हिन्दी कविता देत आहे. ही कविता मी खूप आधी , बहुतेक मुम्बई ब्लास्ट च्या वेळी केलेली आहे.
हम भारतवासी
याद करो वह वचन जो दिया युधिष्ठीर ने
"हम पाच नही, है एकसौ पाच !"
आक्रमण किया अगर हमारे अपनोन्पर किसीने,
मिटा देन्गे उसे----------
अपनोन्पर न आने देन्गे आच.

क्या समझते है दुनियावाले हमको?
हम नही किसीसे डरनेवाले.
अगर उठायेगा हमपर कोई शस्त्र
मत भूलो हमारे पास भी है ब्रम्हास्त्र.

आपसमे हम भले ही लडते हो
क्या भाई- भाई आपसमे लडेन्गे नही?
जितना ज्याद लडे -झगडेन्गे
प्यार बढेगा उतनाही.
एक दूसरेसे बन्धी सीध प्यार की
पक्की बनेगी उतनीही.

दुनिया यह ना समझे-हम कमज़ोर है
आपसमे भले ही हम लडे
दुनियाके लिये हम एक है-
क्या इतिहास ने बार बार नही जताया है?

याद करो आक्रमण चीन का
या फ़िर आक्रमण जो हुए सरहद्पर ,
हमेशा ही भारत की जनताने आवाज उठाई है
आक्रमणकारी को मुह की खानी पडी है.

आज भी अगर कोइ चाहता है आजमाना
करे आक्रमण -उत्तर देगी हमारी एकता
पीछे नही हटेन्गे हम
यह नही हमार धर्म
सहिष्णुता को हमारी कमजोरी मत समझना
पछताना पडे ऐसा काम न करना
हम है हिम्मतवाले, हम है बलवान
शान्तिप्रिय हम-परन्तु है जाग्रुत आत्मसम्मान.

अगर किसी भाई को हमारे
लगी चोट जरा सी
पूरा भारत गरज उठेगा
इसमे न भूल जरासी.

ललकारो ना हमारी वीरता को
पहचानो निद्रिस्त गजराज को
अगर इसे छेडोगे
तबाही मचायेगा
आसमन्त सर्व ध्वस्त कर देगा.

दुनिया याद रखे सदा
भारतवासी है हम
शान्तिप्रिय सह्जीवन का हमारा नारा
हमे है प्र्यार दुनियासे-
लेकिन भारत सबसे प्यारा.



Wednesday, 19 May 2010

पडद्या मागचा अंक चौथा --विजय पान्ढरीपान्डे

ही लघु कादम्बरी दोन प्रतिभावन्तान्च्या पत्रव्यवहारातून नाट्यक्शेत्रातील घडामोडी,नटकातील पात्रे आणी त्यामागील खरीखुरी व्यक्तिमत्वे यान्च्या बद्दलचे लोकापवाद, प्रवाद, आणी सत्य परिस्थिती यान्चा मागोवा घेते।
यातली मानवी मनाचे वेगळे वेगळे पैलू दखवणारी ,अविनाश नाडकर्णी व आनन्दघन ऊर्फ़ गणपत विष्णु जोशी, यान्ची शब्दिक देवाण घेवाण अतिशय ह्रुद्य आहे। नकळत आपण त्यान्च्या आयुष्यात गुन्तत जातो। प्र्यत्येक पत्रात एक नवी जाणीव, माहिती आणी उत्कन्ठा वाढवणारा शेवट हे लघु कादम्बरी चे वैशिष्ट्य आहे।
नाट्य स्रुष्टीतील काही घटनान्शी, व्यक्तीन्शी या गोष्टीतील घटनान्चे वा पात्रान्चे साधर्म्य लक्शात येते।पण अशा घटना कुठल्याही कला क्शेत्रात पहायला मिळतात. आपण सर्वसामान्य लोक त्याना larger than life असे रूप देतात आणी सामान्य माणसाना असणार्या भावना,आशा आकान्क्शा,आणी जीवन हे सगळेच deny करतात. त्यातले काही आपल्या कलाकारान्बद्दलच्या कल्पनान्प्रमाणे असतील ही पण सगळेच सारखे नसतात ---हेच या कदम्बरीत दाखवून दिले आहे. ते वाचुन, आपण या मनस्वी लोकाना सामान्य माणसाप्रमाणे जगण्याचा हक्क नाका्रतो का? असा सन्देह मनात निर्माण होतो.
पत्रलेखकान्ची आयुष्ये, त्यान्चे भूतकाल,वर्तमान्काल, सुखदुःखे, हे सर्व पण या पत्रामधून उलगडत जाते. शेवट अपेक्शित असला तरि मनात अशी एक इच्छा राहते कि लेखकाने ही गोष्ट आणखी पुढे न्यायला हवी होती. यातच लेखकाचे यश सामावले आहे.